मेहरूण तलावात बुडाल्याने 12 वर्षीय बालकाचा मृत्यू


जळगाव : पोहण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय बालकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 12 वाजता घडली. कुणाल कैलास चव्हाण (वय 12, रा. सिद्धार्थनगर, रामेश्वर कॉलनी) असे मृत बालकाचे नाव आहे. कुणाल हा जयदुर्गा माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी तो सिंधी कॉलनीत मावशीकडे आला होता. तेथून घरी गेल्यानंतर पुन्हा दोन मित्रांसह मेहरूण तलावात पोहण्यासाठी आला. सांडव्याच्या बाजूने पोहण्यासाठी त्याने पाण्यात उडी घेतली. खोलीचा अंदाज न आल्याने तसेच गाळात रुतल्यामुळे कुणाल पाण्यातून बाहेर येऊ शकला नाही. पट्टीच्या पोहणार्‍यांनी थोड्याच वेळात कुणालला बाहेर काढले परंतु तोपर्यंत उशीर झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !