आर्थिक व मानसिक त्रासाने त्रस्त पोलिसाने पोलिस ठाण्यात गोळी झाडून केली आत्महत्या


लातूर : आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून जिल्ह्यातील किल्लारी पोलिस ठाण्यातील साहेब सावंत (38) या कर्मचार्‍याने रायफलने पोलिस ठाण्यातहच गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, काही दिवसांपासून ते पैशांच्या देवाण-घेवाणीच्या मानसिक त्रासातून जात होते. त्यातूनच ही आत्महत्या झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. साहेब सावंत हे कासार शिर्शी येथे असताना त्यांनी काही प्लॉट घेतले होते. यातून काही आर्थिक व्यवहार झाले होते. या व्यवहारातून आर्थिक वाद निर्माण झाले असल्याचे म्हटले जात होते. सध्या त्यांची नेमणूक किल्लारी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

रायफलमधून गोळी झाडत आत्महत्या
मध्यरात्री त्यांनी ठाण्यातील रायफलचा वापर करत आत्महत्या केली आहे. किल्लारी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सध्या पोलीस त्याचा तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगले किल्लारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयत पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती सकाळच्या वेळी समजताच किल्लारी आणि परिसरातील नागरीकांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती. आत्महत्येपूर्वी काही चिठ्ठी लिहून ठेवण्यात आल्याची माहिती असून त्याची सत्यता पडताळणी सुरू असल्याचे माहिती सूत्रांनी दिली. साहेब सावंत यांच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !