रावेरातील एक कोटींचे हेरॉईन प्रकरण : महिला आरोपीचा जामिनासाठी अर्ज
भुसावळ : रावेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने 18 डिसेंबर 2021 रोजी सुमारे एक कोटींच्या हेरॉईनसह अख्तरी बानो या महिलेस अटक केली हेाती. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून महिला आरोपी कारागृहात असून त्यांच्यावतीने भुसावळतील अॅड.सत्यनारायण आर.पाल यांनी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी न्या.आर.एम.जाधव यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर शनिवार, 19 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. तपास रावेरचे सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.


