16 वर्षीय युवतीने गळफास घेत आत्महत्या
नाशिक : 16 वर्षीय युवतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सिडकोतील सावतानगर भागात ही घटना घडली. दीपाली गंगाधर शेळके (रा.शनिचौक, सावतानगर) असे मयताचे नाव असून आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अंबड पोलिस ठाण्यात नोंद
दीपाली शेळके हिने कुठल्यातरी कारणातून सोमवारी आपल्या राहत्या घरी पंख्याच्या हुकास ओढणी बांधून गळफास घेतला. याबाबत देवेश शेळके यांनी खबर दिल्याने अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलिस नाईक अतुल बनतोडे करीत आहेत.

