पोहण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा नदीपात्रात मृत्यू


बुलढाणा : पूर्णा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या 11 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. अर्जुन (पुर्ण नाव माहित नाही) असे मयताचे नाव आहे.

नातेवाईकांचा आक्रोश
नदीपात्रात यंत्राद्वारे खोदकाम केलेल्या खड्ड्यात बुडल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांनी नदीपात्रात मुलाचा तात्काळ शोध घेवून त्याला शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला तर गावकर्‍यानी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. वाळूमाफियांकडून होणार वाळू उपसा थांबवा, आणि संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पोलिसांनी दिले कारवाईचे आश्वासन
दरम्यान, ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल जवंजाळ यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून घेत चौकशी अंतर्गत गुन्हा दाखल करू, असे नातेवाईकांना आश्वासन दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !