सीएनजी कार पेटली : एकाचा होरपळून मृत्यू


सिन्नर : सिन्नर घोटी राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या वेळी घाटाजवळ कारला लागलेल्या आगीत एकाच मृत्यू झाला. बुधवारी पहाटे 4.15 दरम्यान बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. या घटनेत कारचा चालक होरपळून मृत्यु झाला. विठ्ठल कृष्णा कोकाटे (24, रा. अहमदनगर, ह. मु. पनवेल) असे मयताचे नाव आहे

गॅस टाकीने घेतला पेट
कोकाटे यांची ट्रॅव्हल्सची कार क्र. एम. एच. 46 बी. बी. 6261 असून ते मुंबईहून भाडे घेऊन शिर्डी येथे आले होते. शिर्डीला भाडे सोडवून ते मंगळवारी रात्री मुंबईला निघाले होते. पहाटेच्या सुमारास घोरवड घाटात आले असता कारमधील गॅसच्या टाकीने अचानक पेट घेतला. बघता-बघता पुर्ण कारने पेट घेतल्याने चारही दरवाजे आतून लॉक झाल्याने त्यांना कारबाहेर पडता आले नाही. रात्रीच्या वेळी महामार्गावर मदतीसाठीही कुणी नसल्याने ते कारमध्येच अडकून पडले. आगीत त्यांचा मोठ्या प्रमाणावर भाजल्याने कारमध्येच त्यांचा मृतदेह जळून खाक झाला.

आगीत कार खाक
कारही पुर्णपणे जळून खाक झाली. बराच वेळानंतर महामार्गाने जाणार्‍या काही वाहनधारकांनी सिन्नर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिल्यानंतर एएसआय गणेश परदेशी व पोलिस नाईक नवनाथ शिरोळे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. जळालेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नगरपरिदेच्या रुग्णालयात पाठवण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !