भरधाव पिकअपने उडवले : दुचाकीस्वाराचा मृत्यू


नाशिक : आडगाव म्हसरूळ लिंकरोडवर भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्याने 55 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सुभाष वामन कोठावदे (55) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी देवेंद्र सोनगीरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पसार झालेल्या अज्ञात पिकअप चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दळण घेवून जाताना अपघात
कोठावदे मंगळवारी राधा कांबळे या महिलेस सोबत घेवून दळण दळण्यासाठी गिरणीवर जात असतांना हा अपघात झाला. कोठावदे दुचाकीने जात असतांना आडगाव म्हसरूळ लिंकरोडरील देशमुख चौकात रस्ता ओलांडत असतांना भरधाव आलेल्या अज्ञात पिकअपने त्यांच्या गाडीस जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. त्यातील चालक कोठावदे यांचा मृत्यू झाला. तपास उपनिरीक्षक चतुर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !