जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या वाहनाला अपघात
जळगाव : जळगाव शहराचे माजी महापौर व विद्यमान सभागृह नेते ललित कोल्हे यांच्या वाहनाला कोल्हापूर जाताना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने वेळेवर एयर बॅग्ज उघडल्याने अनर्थ टळला.
गाडीचे नुकसान मात्र तिघे बचावले
सूत्रांच्या माहितीनुसार ललित कोल्हे हे आपल्या खाजगी कामानिमित्त चारचाकी (एम.एच.04 जी.जे.9924) या वाहनाने आपला सहकारी चालक व मित्रासह जात असताना भरधाव वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरीगेटस्वर आदळले मात्र सुदैवाने एयरबॅग्ज उघडल्याने कुणालाही ईजा झाली नाही. कोल्हे यांच्याशी अपघाताची माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.
(सविस्तर वृत्त काही वेळात)
(सविस्तर वृत्त काही वेळात)