जामठीत अवैध दारू विक्रेत्यांवर अखेर कारवाई


बोदवड : तालुक्यातील जामठी येथील ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री बंद करण्यासंदर्भात बोदवड पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत मंगळवारी अवैधरीत्या दारू विक्री करणार्‍या दोघा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत बाजार पट्ट्यालगत टपरीच्या आडोशातून 364 रुपये किमतींच्या देशी दारुच्या सात बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी कॉन्स्टेबल निखील मुकूंदा नारखेडे यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी ताराचंद लक्ष्मण बिरकोडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसर्‍या कारवाईत 416 रुपये किमतींच्या आठ देशी दारूच्या बाटल्या जत्त करण्यात आल्या. पोलिस कॉन्स्टेबल राहुल सखाराम जोहरे यांच्या फिर्यादीवरुन गणेश पुरुषोत्तम वाघ (जामठी) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एएसआय भोसले, मनोज पाटील आदींनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !