चाळीसगावचे कवी, साहित्यिक दिनेश चव्हाण यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार जाहीर
24 रोजी 21 व्या ग्रामीण साहित्य संमेलनात पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते होणार वितरण
ईगतपुरी – महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व इगतपुरी तालुका साहित्य मंडळ यांच्या विद्यमाने
रविवार, 24 रोजी इगतपुरी येथील वाडीवर्हे येथे होणार्या 21 व्या ग्रामीण साहित्य संमेलनात चाळीसगावचे प्रसिद्ध चित्रकार कवी साहित्यिक दिनेश चव्हाण यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कलाक्षेत्रासाठी हा एकमेव पुरस्कार त्यांच्या कलाप्रवास लक्षात घेऊन साहित्य मंडळाने जाहीर केल्याची माहिती ज्येष्ठ साहित्यीक पुंजाजी मालुंजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिनेश चव्हाण यांचे शीघ्र रेखाटन सर्वांना परीचीत आहे, शिवाय त्यांच्या स्व कल्पनेतून आलेले चित्र- चारोळी सदर महाराष्ट्रभर गाजतय. पोट्रेट, स्केचेस, व्यंगचित्र, कथाचित्र, काव्यचित्र, मुखपृष्ठ, लोबो, कलात्मक आर्ट, या अश्या कला प्रकारातून त्यांनी महाराष्ट्रभर सन्मान मिळवला आहे, शिवाय ते कवी साहित्यिक देखील आहेत. त्यांना कला व काव्य क्षेत्रात अनेक सन्मान पुरस्कार देखील मिळालेले आहेत. पुरस्कार जाहीर झाल्याने चव्हाण यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
