किरकोळ कारणावरून दोन गटात सोनवद येथे हाणामारी


धरणगाव : तालुक्यातील सोनवद येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

परस्परविरोधात गुन्हा
धरणगाव तालुक्यातील सोनवद येथील रहिवासी पुरूषोत्तम भानुदास ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पुरूषोत्तम हे त्यांची पत्नी सुमन ठाकूर सोबत आपसात बोलत असतांना गल्लीतील अर्जुन नागो कोळी, पंकज अर्जून कोळी, चावदास नागो कोळी, दिनेश नागो कोळी, हर्षल दिनेश कोळी, गौरव दिनेश कोळी, वसंत चिंतामन कोळी, सुग्रीव चिंतामन कोळी आणि चेतन कोळी (सर्व रा.सोनवद, ता.धरणगाव) यांनी पुरूषोत्तम व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ व चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली.

दुसर्‍या गटाचीही तक्रार
दुसर्‍या गटातर्फे अर्जुन नागो कोळी यांच्या तक्रारीनुसार पुरूषोत्तम भानुदास ठाकूर (सोनवणे) हे त्यांच्या पत्नी सुमन ठाकूर यांना शिविगाळ व मारहाण करत होते. त्याला समजविण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ करून धारदार धातूच्या पट्टीने मारहाण केली. या घटनेप्रकरणी परस्परविरोधात धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार राजेंद्र कोळी करीत आहे.

धक्कादायक ! : एस.टी.कर्मचारी आक्रमक : शरद पवारांच्या बंगल्यात चपला फेकल्या, दगड भिरकावले

 


कॉपी करू नका.