दीपनगर रोटरी क्लब अध्यक्षपदी राजेंद्र निकम


पदग्रहण सोहळा उत्साहात : सचिवपदी जे.पी.पाटील

दीपनगर- रोटरी क्लब ऑफ दीपनगरचा पदग्रहण नुकताच उत्साहात झाला. याप्रसंगी नूतन अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी उमाकांत चव्हाण यांच्याकडून तर सचिव जे.पी.पाटील यांनी यशवंत शिरसाट यांच्याकडून पदभार स्वीकारला. मावळते अध्यक्ष व सचिव, पदाधिकार्‍यांनी नवीन अध्यक्ष व सचिव पदाधिकार्‍यांना रोटरी पीन लावून पदभार सोपवला

यांची होती प्रमुख उपस्थिती
या सोहळ्याला चीफ गेस्ट म्हणून डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रोट. राजेंद्र भामरे (मालेगाव), दीपनगरचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, नवीन प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे, असिस्टंट गव्ह.चेतन पाटील (भुसावळ) उपस्थित होते. चव्हाण यांनी गत वर्षात केलेल्या समाजोपयोगी कामांचा लेखाजोखा मांडला आणि नूतन अध्यक्ष रोट.राजेंद्र निकम यांनी येत्या वर्षभरात नियोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्रजी भामरे यांनी रोटरीला तळागाळात पोहचण्यासाठी मार्गदर्शन करत मदतीचे आश्वासनही दिले. मुख्य अभियंता पंकज सपाटे व विवेक रोकडे यांनीही मार्गदर्शन करून नवनियुक्त अध्यक्ष व सचिवांना शुभेच्छा दिल्या. दीपनगर रोटरी परीवारात नव्याने समाविष्ट झालेल्या बालाजी बोले, रणजीत पारडे, प्रमोद पाटील, भरत सरोदे या चार सदस्यांचे रोटरी पीन लावून स्वागत करण्यात आले. नितीन देवरे यांनी सूत्रसंचालन तर आभार सचिव जे.पी.पाटील यांनी मानले. चीफ गेस्ट राजेंद्र भामरे यांचा परीचय चेतन पाटील यांनी करून दिला. दरम्यान, उपमुख्य अभियंता मदन अहिरकर, मधुकर पेटकर, अधीक्षक अभियंता चिंतामण निमजे, सुरक्षा अधिकारी के.एल.पाटील, कल्याण अधिकारी पंकज सनेर, दीपनगरचे सर्व रोटेरीयन्स डॉ प्रशांत जाधव, संजय पखान, धनंजय पन्धाडे, दत्ता पिंपळे, राजू ताले, मुरलीधर थेरोकार, विकास भराडे, मिलिंद धर्माधिकारी, सुनील सहपरीवार उपस्थित होते.


कॉपी करू नका.