राज्यातील 27 महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण जाहीर
मुंबई : राज्यभरातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत बुधवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महानगरपालिकांचे महापौर, उपमहापौर तसेच पदाधिकारी, नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव, अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे, कक्ष अधिकारी श्रीमती निकीता पांडे, महानगरपालिकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. महापौर, सहसचिव तसेच महानगरपालिकांच्या पदाधिकार्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रवर्गातील महिला आरक्षणाच्या सोडती महिला पदाधिकार्यांच्या हस्ते काढण्यात आल्या.
राज्यातील महापालिकांची महापौर सोडत



खुला प्रवर्ग, सर्वसाधारण- मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण, सांगली, उल्हासनगर,
खुला प्रवर्ग, महिला आरक्षित- नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद,
अनुसुचित जमाती- वसई-विरार महानगरपालिका
अनुसूचित जाती (महिला)- अहमदनगर व परभणी महानगरपालिका
अनुसूचित जाती- मीरा भाईंदर महानगरपालिका
मागास प्रवर्ग (महिला)- नांदेड, सोलापूर व कोल्हापूर, मालेगाव महानगरपालिका
मागास प्रवर्ग- लातूर, धुळे व अमरावती महानगरपालिका
