हेडफोनमुळे झाला घात : रेल्वे रूळ ओलांडताना जळगावातील तरुणीचा मृत्यू


जळगाव : कानात लावलेल्या हेडफोनमुळे रेल्वेचा आवाज न आल्याने तरुणीला रेल्वेचा धक्का लागल्याने आपले प्राण गमवावे लागले. ही घटना शहरातील शिवाजी नगराजवळ सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. स्नेहल वैभव उज्जैनकर (19, धनाजी काळे नगर, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे.

रेल्वे धक्क्याने तरुणीचा मृत्यू
स्नेहल उज्जैनकर ही तरुणी आपल्या आई-वडीलांसह शिवाजी नगर परीसरातील धनाजी काळे नगरात वास्तव्याला आहे. स्नेहल ही शहरातील एका कॉस्मॅटीक दुकानावर नोकरीला आहे. नेहमीप्रमाणे सोमवार, 23 मे रोजी रात्री 8.30 वाजता स्नेहल कामावरून घरी पायी जाण्यासाठी निघाली. स्नेहलने तिच्या कानात हेडफोन लावलेला होता. जळगाव तहसील कार्यालयाजवळून शिवाजी नगरात जाण्यासाठी रेल्वेरूळ क्रॉस करत असतांना भुसावळकडून जळगावकडे येणारी धावत्या सुरत पॅसेंजर गाडीचा जोराचा धक्का लागल्याने स्नेहल जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेवून मृतदेह जिलहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास लोहमार्ग पोलिस कर्मचारी सचिनकुमार भावसार आणि किशोर पाटील करीत आहे.

 


कॉपी करू नका.