चाळीसगावातील दोघा लाचखोर पोलिसांची जामिनावर सुटका


चाळीसगाव : विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासह दोषारोपपत्र लवकर न्यायालयात सादर करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागून चार हजारात तडजोड करणार्‍या चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे (वय 52, रा. वैष्णवी पार्क, चाळीसगाव) व पोलिस नाईक शैलेश आत्माराम पाटील (वय 38, रा. चाळीसगाव) यांना मंगळवारी सायंकाळी सात वाजता सिग्नल चौकात अटक केली होती. दरम्यान, संशयीतांना बुधवारी जळगाव न्यायालयात न्या.खडसे यांच्या न्यायासनापुढे हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर नंतर संशयीत आरोपींच्या वतीने जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला.

चार हजारांची लाच भोवली
55 वर्षीय तक्रारदार यांच्या मुलीने चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात सासरची मंडळी हुंडा मागून छळ करीत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या कागदपत्रांसाठी मदत करू, असे सांगून चार्जशीट लवकरात लवकर पाठवण्याच्या मोबदल्यात दोन्ही पोलिसांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मंगळवारी मागितली. तडजोड झाल्यानंतर चार हजारांची लाच देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. यानंतर रात्री शहरातील सिग्नल चौकात सापळा रचण्यात आला. एका चहाच्या टपरीवर दोघांनी चार लाच स्वीकारताच पंचांसमक्ष पथकाने आरोपींना अटक करण्यात आली होती.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनिल शिरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

अंगणातील सांडपाण्याच्या कारणावरून सावद्यात दाम्पत्यास मारहाण


कॉपी करू नका.