60 लाखांच्या खंडणीसाठी जळगावातील आर.सी.बाफना ज्वेलर्सचे 80 संगणक हॅक
जळगाव : 60 लाखांच्या खंडणीसाठी जळगावातील सुप्रसिद्ध आर.सी.बाफना ज्वेलर्सच्या जळगाव मुख्यालयातील 80 कॉम्प्युटर (संगणक) अज्ञात व्यक्तीकडून हॅकर्सने हॅक केल्याची घटना उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलिसात करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रथमच डाटा हॅक करून खंडणी मागितल्याची घटना
रतनलाल सी. बाफणा ज्वेलर्समधील 80 संगणकांचा डेटा परदेशातील हॅकर्सने 25 नोव्हेंबर रोजी हॅक केला व तो परत मिळवुन देण्यासाठी हॅकरने प्रती संगणक 980 डॉलर (सुमारे 60 लाख) रुपयांची खंडणी मागितली आहे. या प्रकरणी बाफणा ज्वेलर्सचे संचालक सिद्धार्थ बाफणा यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला. 25 नोव्हेंबर रोजी शोरुममधील 80 संगणक काही वेळासाठी बंद झाल्यानंतर बिलींग सॉफ्टवेअर, कस्टमर डिटेल्स, ट्रान्झॅक्शन डिटेल्स व अकाऊंट या विभागातील संगणकांतून डेटा हॅक झाल्याचे समजते.



