जळगावात चोरट्यांनी चोरीसाठी चक्क घराची भिंत फोडली : त्रिकुटाविरोधात गुन्हा


In Jalgaon, thieves broke the wall of a house to steal: crime against the trio जळगाव : शहरातील खंडेराव नगर येथे पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या एका घराची चक्क भिंत फोडून चोरट्यांनी घरातील स्टीलच्या डब्याचे झाकण, लोखंडी पत्रे, लोखंडी प्लेट असा एकूण 3 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल लांबला. या प्रकरणी बुधवार, 20 जुलै रोजी रामानंदनगर पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामानंद नगर पोलिसात गुन्हा
जळगावच्या खंडेराव नगरात पाण्याच्या टाकीच्याजवळ सपना हरी मोरे (40) या वास्तव्यास आहेत. 16 जुलै ते 20 जुलै दरम्यान त्यांंच्या घराची भिंत फोडून घरातील 300 रुपयांचे डब्याचे झाकण, 3 हजार रुपयांचे 6 लोखंडी पत्रे, 400 रुपयांच्या 4 लोखंडी प्लेट असा एकूण 3 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेल्याचे समोर आले. याप्रकरणी सपना मोरे यांच्या तक्रारीवरुन बुधवारी रामानंदनगर पोलिसात नसरीन खान नासीर खान, अप्पू नासीर खान, अज्जू नासीर खान (रा.खंडेराव नगर) या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे हे करीत आहेत.

चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात निरीक्षक के.के.पाटील यांनी पदभार स्वीकारला


कॉपी करू नका.