महाविकास आघाडी सरकार स्थापनेनंतर भुसावळात जल्लोष


राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी लाडूंचे वाटप करीत केली आतषबाजी

भुसावळ : राज्यात भाजप सरकार अवघ्या तीन दिवसानंतर नाट्यमयरीत्या पाय उतार झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येत सरकार स्थापन केले तर गुरुवारी तीनही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी मुंबईतील शिवतीर्थावर शपथविधी घेतल्यानंतर भुसावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी लाडूंचे वाटप करीत फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या शनी मंदिर वॉर्डातील कार्यालयाबाहेर तसेच अष्टभूजा देवी समोर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, मनीष ट्रॅव्हल्ससमोर तसेच बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादीच्या विजयाचा घोषणा देण्यात आल्या.

यांची होती उपस्थिती
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व मनीष ट्रॅव्हल्सचे संचालक सतीश घुले, दुर्गेश ठाकूर, सिकंदर खान, साजीद शेख, राहुल बोरसे, सचिन पाटील, सलीम पिंजारी, संगीत खरे, दीपक दीपके, प्रवीण आखाडे, विवेक यशोदे, शेतकी संघाचे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !