मनवेलला अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांनी रोखला
यावल : तालुक्यातील मनवेल येथील एका समाजातील अल्पवयीन मुलीच्या होत असलेला विवाह पोलिसांच्या मदतीने रोखण्यात आला. मनवेल गावातील एका कुटुंबातील कन्येला गुरुवारी हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता तर पारोळा येथील वर पक्षातील मंडळी मंडपात आल्यानंतर यावलचे पोलिस निरीक्षक रंमाकात सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक जितेद्र खैरनार, सिकंदर तडवी, साकळी पोलिस चौकीचे संदीप भोई, पोलिस मित्र नाना भालेराव, होमगार्ड संरपच नरेद्र पाटील यांनी विवाहस्थळी भेट दिली. वधूचे वय कमी असल्याने होणारा लग्न सोहळा थांबवावा, अशा सूचना करण्यात आल्या तर पोलिसांनी लेखी समज दिल्यानंतर शुक्रवर, 29 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी होणारा लग्न सोहळा अखेर रद्द करण्यात आला.
