बियाणी स्कुलच्या मुख्याध्यापिका सोफीया फ्रान्सीस यांचा आदर्श शैक्षणिक पुरस्काराने गौरव
भुसावळ : बियाणी स्कुलच्या मुख्याध्यापिका सोफीया फ्रान्सिस यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल इंडिया बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएशन अॅण्ड ग्लोबल सोसायटी फोर हेल्थ अॅण्ड एज्युकेशनतर्फे राष्ट्रीय सामाजिक आणि आर्थिक विकास कार्यक्रमांतर्गत भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक आदर्श पुरस्काराने व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल, सदस्य सामाजिक विकास मंत्रालय भारत सरकारचे राजेंद्र पाल गौतम, भारतीय परराष्ट्र सेवाचे राजदूत डॉ.व्ही.बी.सोनी, राज्यसभा सदस्य रीपुन बोरा, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी चिटणीस मेजर वेदप्रकाश, उत्तराखंड प्रवासी समनव्यक संस्थेचे माजी उपाध्यक्ष पी.सी.नाईलवाल, एआयसीसी आसामयचे चिटणीस हरीपाल रावत, दिल्ली विधान परीषद सदस्य अलका लांबा आदी मान्यवरांची प्रसंगी उपस्थिती होती. दरम्यान, पुरस्कारानंतर संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी संगीता बियाणी यांच्यातर्फे मुख्याध्यापिका यांचा सत्कार करण्यात आला. दोन्ही माध्यमांच्या शिक्षक-शिक्षकांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
