भुसावळात कावड यात्रा उत्साहात


भुसावळ : शहरातील राजस्थानी विप्र समाज, शिव मंडळ, अलंकार मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर भुसावळ शहरात भव्य कावड यात्रा काढण्यात आली.
राजस्थानी समाज व हिंदी भाषिकांचा आज अखेरचा श्रावण सोमवार असल्याने कावड यात्रा काढण्यात आली.
राजस्थानी विप्र समाजातर्फे साबूदाना खिचडी, चहा, केळी व फळांचे प्रसाद स्वरूपात कावड यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना वाटप करण्यात आले. महादेव मंदिर, तापी नदी येथून प्रारंभ झालेली ही कावड यात्रा विठ्ठल मंदिर, शिव मंदिर, लक्ष्मी चौक, महादेव मंदिर व राम मंदिरात आरती व प्रसादाचे भोग लावण्यात आला.

यांचा कावड यात्रेत सहभाग
राधेभक्त बिरदीचंद लाहोटी, राजस्थानी विप्र युवक समाजाचे अध्यक्ष तथा रक्षा सुरक्षा एजन्सीचे संचालक विनोद शर्मा, उमाकांत (नमा) शर्मा, जगदीश अग्रवाल, गोकुल अग्रवाल, संजय अग्रवाल, गौरव शर्मा, पंडित जगदीश शर्मा, पंडित गोपाल शर्मा, कैलाश अग्रवाल, दीपचंद आगीवाल, गोसेवक रोहित महाले, अमोल सोनार, गणेश पाटील, शुभम अग्रवाल, मोंटू वर्मा, दिनेश माहेश्वरी, आशिष तिवारी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंडित राम गोपाल शर्मा, आदित्य शर्मा, प्रशांत शर्मा, रूपेश अग्रवाल यांनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.