चोरट्यांनी सव्वा लाखांचे पाईपांचे व्हॉल्व्ह लांबवले


Thieves removed valves of pipes worth half a million जळगाव : भादली शिवारातील वाघूर कालवा उपसा सिंचन योजनेंतर्गत लागणारे पाईप व्हॉल्व्ह अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

75 व्हॉल्व्ह चोरट्यांनी लांबवले
महाराष्ट्र शासनाच्या कानसवाडा, शेळगाव, कडगाव व इतर शिवारात राबविण्यात आलेल्या वाघूर कालवा उपसा सिंचन योजनेंतर्गत भादली शिवारात येथे काही पाईपांचे व्हॉल्व्ह ठेवण्यात आले मात्र चोरट्यांनी एक लाख 12 हजार 500 रुपये किंमतीचे 75 व्हॉल्व्ह लांबवले. ही बाब बुधवार, 27 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. या संदर्भात या प्रकल्पाचे व्यवस्थापक खुशाल डोंगरमल देसर्डा (32, रा.भिकमचंद जैन नगर, यश लॉन जळगाव) यांचय फिर्यादीनुसार बुधवारी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलि हेड कॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहे.

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्य : राज्यातील 365 ठिकाणच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाविनाच


कॉपी करू नका.