भुसावळ तालुक्यात पंचायत समितीच्या माजी सभापतींसह सदस्यास आरक्षणाने धक्का
चुरस वाढणार : भुसावळ तालुक्यात विद्यमान चार पंचायत समिती सदस्यांना आरक्षणामुळे मिळाला दिलासा : चार जागांवर महिला येणार निवडून : इच्छुकांची वाढणार भाऊगर्दी
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील पंचायत समितीच्या आठ गणांसाठी आरक्षण सोडत गुरुवारी सकाळी 11 वाजता पंचायत समिती कार्यालयात काढण्यात आली. प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी तहसीलदार दीपक धीवरे, प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, नायब तहसीलदार अंगद आसटकर, भाऊसाहेब शिरसाठ, राजेंद्र फेगडे आदींची उपस्थिती होती. यावेळी रुजल चौधरी या बालकाच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. दरम्यान, सुधारीत आरक्षणानुसार भुसावळ तालुक्यातील यापूर्वी असलेले सहा गण आता आठ झाले असून त्यात खडका व साकरी या नवीन गणाची भर पडली आहे तर नवीन आरक्षणात चार ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे शिवाय माजी सभापती मनीषा पाटील व माजी सदस्य विजय सुरवाडे यांना आरक्षणामुळे अन्य गण शोधावा लागणार आहे.
भुसावळ तालुक्यातील गणनिहाय आरक्षण असे
खडका- सर्वसाधारण (जनरल), कंडारी- सर्वसाधारण (जनरल), निंभोरा बु.॥- सर्वसाधारण महिला (जनरल महिला), हतनूर- अनुसूचित जमाती महिला (एस.सी.महिला), तळवेल- ईतर मागासवर्गीय (ओबीसी), साकरी- ईतर मागासवर्गीय महिला (ओबीसी महिला), वराडसीम गण- अनुसूचित जाती महिला (एस.सी.महिला), कुर्हा- सर्वसाधारण (सर्वसाधारण).

सुधारीत आरक्षणानंतर बदलणार अशी राजकीय समीकरणे
यापूर्वी वराडसीम गणाचे ओबीसी महिला आरक्षण असल्याने सलग तीन वेळा मनीषा भालचंद्र पाटील या गणातून निवडून आल्या होत्या. नंतर त्यांना सभापतीपदाची संधीही मिळाली मात्र नव्याने निघालेल्या आरक्षणात हा गण एस.सी.महिला राखीव झाल्याने त्यांना दुसर्या गणाचा शोध घ्यावा लागेल तर येथे नवीन चेहर्यांना संधी मिळू शकते.
यापूर्वी कुर्हा गणाचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने येथून सुनील महाजन निवडून आले आहेत तर आता पुन्हा येथे सर्वसाधारण आरक्षण निघाले असलेतरी महाजन हे साकरी-कुर्हा निवडून आले असल्याने सुधारीत गणात साकरी या नवीन गणाची भर पडल्याने महाजन यांना साकरी गणातून त्यांच्या सौभाग्यवती निवडणूक रींगणात राहण्याची शक्यता आहे.
- सुधारीत आरक्षणात साकरी या नवीन गणाची निर्मिती झाली असून येथे ओबीसी महिला आरक्षण असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर चुरस वाढणार आहे.
- तळवेल येथे यापूर्वी येथे अनुसूचित जाती पुरूष आरक्षण असल्याने विजय सुरवाडे निवडून आले होते मात्र आता सुधारीत ओबीसी प्रवर्गासाठी निघाल्याने येथे मोठी चुरस वाढेल तर सुरवाडे यांना अन्य गणातून निवडणूक लढवावी लागणार आहे. माजी सभापती मंगला झोपे या येथे कडवे आव्हान उभे करू शकतात.
- खडका हा सुधारीत आरक्षणात नवीन गण असून येथे सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने येथेदेखील चुरस वाढणार आहे. माजी सभापती प्रीती मुरलीधर पाटील तसेच माजी सरपंच चुडामण भोळे हे आपल्या सौभाग्यवतींना येथे निवडणूक रींगणात उतरण्याची शक्यता आहे.
- कंडारी गणाचे यापूर्वी सर्वसाधारण असल्याने येथून संतोष निसाळकर यांच्या सौभाग्यवती निवडून आल्या होते तर आतादेखील सर्वसाधारण आरल्याने येथेदेखील चुरस वाढणार आहे.
- निंभोरा येथे अनुसूचित जमाती आरक्षण असल्याने वंदना उन्हाळे निवडून आल्या होत्या तर आता जनरल महिला आरक्षण निघाल्याने मोठी चुरस वाढणार आहे.
- हतनूर येथे यापूर्वी अनुसूचित जमाती सर्वसाधारण आरक्षण असल्याने येथून वंदना सदानंद उन्हाळे निवडून आल्या होत्या तर आता एस.टी.जमाती महिला आरक्षण असल्याने उन्हाळे यांना दिलासा मिळाला आहे.
रावेर तालुक्यात दोन गण वाढले : नवख्यांना मिळणार संधी
सावदा पालिकेत पाच जागांवर ओबीसी उमेदवारांना संधी

