कुटुंब घरात झोपले असतानाच मालोदमधून चोरट्यांनी लांबवले अलगद सव्वा दोन लाखांचे दागिने


While the family was sleeping in the house, the thieves stole jewelery worth two and a half lakhs separately from Malod यावल : तालुक्यातील मालोद येथील शेतकर्‍यांच्या घराचे कुलूप तोडून दोन लाख 19 हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्री झाली चोरी
मालोद गावातील रहिवासी मुरलिधर बना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जेवण करून ते स्वयंपाक घराच्या मागील बाजूस लोखंडी दरवाजास आतून कुलूप लावून झोपले होते तर त्यांच्या पत्नी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास पाणी पिण्यासाठी स्वयंपाक घरात जात असतांना घरातील लोखंडी गोदरेज कपाटाचा दरवाजा उघडा दिसला तसेच साड्या वस्तू व अन्य वस्तू खाली पडलेल्या दिसल्या. घरात चोरी झाल्याचे लक्षात आले तसेच घराच्या बाजूच्या गल्लीत चोरट्यांनी लोखंडी पेटीचे व लोखंडी दरवाजाचे कुलूप व चाव्या बाहेर पडलेल्या आढळल्या. चोरट्यांनी गोदरेज कपाटातील 35 ग्रॅमची पोत, दोन सोन्याचे सहा ग्रॅमचे टोंगल, 19 ग्रॅमचे सोन्याचे काप तसेच 17 ग्रॅमची सोन्याची चैन, 15 ग्रॅमचे अंगठीसह अन्य दागिने मिळून दोन लाख 19 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !