Bhosari will commit fraud; Khadse’s jail term is certain: Former minister Girish Mahajan’s claim भोसरी गैरव्यवहार भोवणार ; खडसेंना तुरुंगवास निश्चित : माजी मंत्री गिरीश महाजनांचा दावा
Bhosari will commit fraud; Khadse’s jail term is certain: Former minister Girish Mahajan’s claim
जळगाव : एकनाथ खडसे भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असल्याचा दावा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या काळात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला असलातरी सरकार बदलताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासाठी शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात अर्ज केला असून या प्रकरणी 26 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
जावयासोबत खडसेदेखील राहणार तुरूंगात
दोन वर्षांपासून ज्या केसेस सुरू आहे, ईडीची जी चौकशी सुरू आहे, भोसरी प्रकरणात जे प्रकरणात त्यांनी जे पराक्रम केले आहेत, ते सर्वांच्या समोर आहेत. त्यांचे जावई वर्षभरापासून तुरूंगात आहेत. त्यांना न्यायालय अजूनही जामीन का देत नाही? त्यात अनियमतता आहे, असे महाजन म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.


30 कोटींच्या जमिनीची तीन कोटीत खरेदी
बोगस कंपनीकडून त्यांनी पैसे फिरवले, साडेतीन कोटी आपल्या अकाऊंटमध्ये आणले, अर्धे मंदाकिनी वहिनी, जावयांच्या नावावर जमिनी घेतल्या. 30 कोटींची जमीन 3 कोटी रूपये दाखवले. अधिकारी विनाकारण तुरुंगात गेला. यांनी मंत्री असताना चुकीची कामं केली आहेत म्हणून ते ईडीच्या फेर्यात सापडलेत. सध्या न्यायालयाच्या नो कोर्स ऑफ अॅक्शनमुळेच ते तुरूंगात जात नाहीत. ते हटल्यानंतर यांनाही जावयासोबत जावं लागेल हे सूर्यप्रकाशाइतकंच स्वच्छ आहे. हा आत टाकतोय, तो टाकतोय याला अर्थ नाही. चौकशीला सामोरे जाऊन कागदपत्रे द्यावी, असेही महाजन म्हणाले.