Wheelchair commode gift to Railcity Ortho Bank रेलसिटी ऑर्थो बँकेला व्हीलचेअर कमोड भेट


Wheelchair commode gift to Railcity Ortho Bank भुसावळ : शहरातील गुरुद्वारा येथे रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी आणि गुरुद्वारा प्रबंधक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन वर्षांपासून ऑर्थो बँक कार्यरत आहे. गरजू रुग्णाला लागणार्‍या वॉटर बेड, व्हीलचेअर, कमोड, वॉकर आदी वस्तू याद्वारे नाममात्र शुल्कात वापरण्यास देण्यात येतात. या रेलसिटी ऑर्थो बँकेला मूळचे भुसावळचे रहिवासी हेमंत शर्मा यांनी त्यांच्या दिवंगत आईच्या स्मरणार्थ एक व्हीलचेअर कमोड भेट दिली.

यांची होती उपस्थिती
रोटरी प्रांत 3030 चे प्रांतपाल डॉ.आनंद झुनझुनवाला यांच्या हस्ते व्हीलचेअर लोकार्पण सोहळा गुरुद्वारात पार पडला. डॉ.आनंद यांच्या हस्ते दात्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना डॉ.आनंद यांनी दुःखाच्या प्रसंगीदेखील सेवाभावी वृत्ती दाखवल्याबद्दल हेमंत शर्मा व त्यांच्या पत्नी यांचे आभार मानले. प्रोजेक्ट चेअरमन अमित भडंग यांनी आपल्या प्रास्ताविकात शर्मा दाम्पत्याचा आदर्श इतर नागरीकांनी घेऊन गरजू रुग्णांसाठी साहित्य दान करण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष डॉ.मकरंद चांदवडकर यांनी तर सचिव सन्मित पोतदार यांनी आभार मानले. याप्रसंगी गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष बलदेवसिंग पल्ला, सचिव सुरेंदर पाल सिंग, मोनिका झुनझुनवाला, रोटरीचे सहायक प्रांतपाल विकास पाचपांडे, रोटरी सदस्य चेतन पाटील, मनोज सोनार, संदीप जोशी, अमित भडंग आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !