नाशिकच्या ब्रह्मगिरीवर भुसावळ रनर्सची विजयी पताका

तीन महिला धावपटू पोडियम फिनिशर तर तब्बल 80 धावपटूंचा सहभाग


Victory flag of Bhusawal runners at Brahmagiri, Nashik भुसावळ : दरवर्षी रन बडीज या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे त्र्यंबकेश्वर, नाशिक येथील ब्रह्मगिरी पर्वतावर मॅरेथॉन स्पर्धा सात गटात आयोजित करण्यात आली. भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या तब्बल 80 धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. त्यापैकी तब्बल 30 धावपटू प्रथमच शहराबाहेर मॅरेथॉनसाठी सहभागी झाले. 15 किमी गटात डॉ.नीलिमा नेहेते तृतीय, पूनम भंगाळे द्वितीय तर 22 किलोमीटर गटात सीमा पाटील तृतीय ठरल्या. या महिला शक्तीमुळे संपूर्ण मॅरेथॉनचे वातावरण भुसावळमय झाल्याचा अनुभव राष्ट्रीय स्तरावरील धावपटूंनी घेतला.

44 किलोमीटर अंतर धावून केले पूर्ण
भुसावळ रनर्सचे प्रमुख प्रा.प्रवीण फालक यांनी दोन वेळा परीक्रमा न थकता सहजपणे पूर्ण करून 44 किमीचे अशक्यप्राय अंतर धावून पूर्ण केले. या सर्वच बाबींचा विचार करता आयोजकांतर्फे भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनला विशेषत्वे गौरविण्यात आले. भुसावळ रनर्सतर्फे प्रवीण पाटील व डॉ.चारुलता पाटील या भाऊ-बहिणीच्या जोडीने संयुक्तपणे हा सन्मान स्वीकारला.

12 दाम्पत्यांचा यशस्वी सहभाग
80 धावपटूंमध्ये 12 दाम्पत्य एकत्र धावले. यामध्ये प्रवीण फालक व स्वाती फालक, प्रवीण पाटील व अनिता पाटील, प्रवीण वारके व सोनाली वारके, अजय पाटील व चारुलता अजय पाटील, विलास पाटील व सुवर्णा पाटील, राजेंद्र ठाकूर व ममता ठाकूर, हरकेश मुरई व अनुष्का मुरई, संदीप वर्मा व पारुल वर्मा, डॉ निर्मल बलके व पूजा बलके, सुनील सोनगिरे व इंदिरा सोनगिरे ,महेंद्र पाटील व सरला पाटील, पंकज कुलकर्णी व पूनम कुलकर्णी या पती-पत्नीच्या जोडीचा समावेश आहे. याशिवाय डॉ.नीलिमा नेहेते व डॉ.संकेत नेहते ही आई पुत्राची जोडी, माया पवार-मानसी पवार आणि छाया राजपूत-मानसी चव्हाण या माता पुत्रीच्या दोन जोड्या, श्रीकांत जोशी व तन्मय जोशी ही पिता पुत्राची जोडी तसेच कौस्तुभ मंत्री व प्रियंका मंत्री हे भाऊ-बहीण देखील सोबत धावले. 80 पैकी 44 किमीमध्ये एक धावपटू, 22 किमीमध्ये 16 धावपटू, 15 किमीमध्ये 32 धावपटू, 10 किमीमध्ये 23 धावपटू व 5 किमीमध्ये 8 धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !