स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चिंचाटीतून निघणार पदयात्रा
क्रांतीदिनप्रसंगी होणार पदयात्रेचा शुभारंभ : रावेरातील बैठकीत नियोजन
रावेर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 75 व्या वर्धापनदिनानिमित्त रावेर काँग्रेसने रावेर तालुक्यातील सर्व शहरांमध्ये पदयात्रेच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधण्याचा कृती आराखडा तयार केला आहे. काँग्रेसने 9 ऑगस्टपासून रावेर तालुक्यातील सातपुडा येथील चिंचाटी गावातून पदयात्रा सुरू केली जाणार असल्याची माहिती आमदार व प्रदेश उपाध्यक्ष शिरीष चौधरी यांनी येथील बैठकीत दिली. या पदयात्रेत विधानसभा मतदारसंघातील आमदार व वरीष्ठ अधिकारीही सहभागी होतील तसेच 15 ऑगस्टपर्यंत ही पदयात्रा चालणार आहे. रावेर तालुक्यातील सुमारे 120 गावांमध्ये पदयात्रा दाखल होणार असून सोमवार, 15 ऑगस्ट रोजी रावेर शहरातील काँग्रेस भवनात ध्वजारोहण होईल, असेही आमदार म्हणाले.
यांची बैठकीला उपस्थिती
नियोजन बैठकीला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, हरीष गणवाणी, रामदास लहासे, दिलरुबाब तडवी, गोंडू महाजन, डॉ.राजेंद्र पाटील, गुणवंत सातव, सरपंच योगेश पाटील, राहुल पाटील, इस्माईल पहेलवान, सुरेश पाटील शेख, डॉ.कालिंदर तडवी, संतोष पाटील, सावन मेडे, भीमा तायडे, मानसी पवार, प्रतिभा मोरे आदींची उपस्थिती होती.

यावलला आमदारांच्या उपस्थितीत बैठक
यावल : यावल तालुका काँग्रेस कमिटीची बैठक आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी पदयात्रेची सविस्तर माहिती दिली. या यात्रेची सुरुवात मंगळवार, 9 ऑगस्ट रोजी सकाळी कोळन्हावी येथून सुरूवात करण्यात येईल. त्यानंतर डांभूर्णी, उंटावद, चिंचोली, कासारखेडा, नायगाव, किनगाव येथे पदयात्रा दाखल होईल. माजी आमदार रमेश चौधरी, हाजी शब्बीर खान, शेखर बापू पाटील, जावेद जनाब, केतन किरंगे, कदीर खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अमोल भिरूड यांनी तर आभार पुंडलिक बारी यांनी मानले. सुनील फिरके, चंद्रकला इंगळे, सर्फराज तडवी, सय्यद इखलास, नगरसेवक सय्यद युनूस, सरपंच संदीप सोनवणे, सरपंच विलास अडकमोल, सरपंच अजय भालेराव, नगरसेवक रसुल शेठ, नगरसेवक समीर मोमीन, भरत चौधरी, शेख झाकीर, हेमंत चौधरी, नगरसेवक मनोहर सोनवणे, शेख अस्लम, नगरसेवक समीर खान, डॉ.पालवे, युवक अध्यक्ष फैझान शाह, हाजी गफ्फार शाह, गुरव महाजन, इम्रान पहेलवान, अनिल जंजाळे, वासीम तडवी, अझहर शेख, अशफाक शाह, रहेमान भाई खाटीक, रशीद मन्यार, करीम शेठ, मुशीर शेख, विक्की गजरे, नईम शेख, उमेश जावळे, उस्मान तडवी, विनोद सोनवणे, प्रवीण सोनवणे आदी उपस्थित होते.
