Union Minister Nitin Gadkari रावेर लोकसभा क्षेत्रातील राज्य मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा द्यावा

खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी


State roads in Raver Lok Sabha area should be given the status of National Highways मुक्ताईनगर : रावेर लोकसभा मतदारसंघातील राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी शुक्रवारी खासदार रक्षाताई खडसे यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्ली येथील भेटीदरम्यान केली.

वर्दळीच्या रस्त्यांची सद्यस्थितीत वाताहत
रावेर लोकसभा क्षेत्रातील नशिराबाद-सुनसगाव-कुर्‍हा-बोदवड-मलकापूर-शेगाव रस्ता, सावदा-हतनूर-चांगदेव-कोथळी-हरताळा-माळेगाव-बोदवड फाटा रस्ता, फागणे-अमळनेर-चोपडा-खरगोन (मध्यप्रदेश) रस्ता व पाचोरा-वरखेडी-शेंदुर्णी-पहुर रस्ता हे राज्य महामार्ग आहे. या राज्यमार्गांवर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलीतरी सदस्य स्थितीत या रस्त्यांची स्थिती प्रचंड दयनीय झाली आहे. या रस्त्यांना पाहिजे तसा निधी उपलब्ध होत नसल्याने या राज्यमार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन वार्षिक आराखड्यात समाविष्ट करून निधी उपलब्ध करण्याची मागणी खासदारांनी केली.

बर्‍हाणपूर महामार्गाबाबतही साकडे
मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांसाठी महत्वपूर्ण असलेला बर्‍हाणपूर-अंकलेश्वर या महामार्गाच्या राष्ट्रीयीकरणाला गती देण्यात येऊन तत्काळ त्यांची सुधारण करण्यात यावी, अशी मागणी यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकड केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !