Congress Rasta Roko Protest Against Rrising Inflation in Faizpur  फैजपूरात वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन


Congress Rasta Roko Protest Against Rrising Inflation in Faizpur फैजपूर : वाढत्या महागाईसह बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीएसटी दरातील वाढ आदी मागण्यांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी फैजपूरात काँग्रेसतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी मोदी सरकारविरोधात पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

फैजपूरात काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार फैजपूर शहरात आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटी वाढ व केंद्राच्या जुलमी धोरणांना विरोध करण्यासाठी सुभाष चौकात शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती 
फैजपूरातील आंदोलनप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे, युवा नेते धनंजय चौधरी, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष शेखर पाटील, नगरसेवक केतन किरंगे यांची भाषणे झाली. केंद्रातील धोरण, घरगुती गॅस दरवाढ, वीज बिल वाढ, जीवनावश्यक वस्तूवरील 5 टक्के जी.एस.टी. वाढ झाल्याबद्दल घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी फैजपूर गटनेते कलिम मण्यार, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, फैजपूर शहराध्यक्ष शेख रीयाज, यावल शहराध्यक्ष कदीर खान, महिला आघाडी चंद्रकला इंगळे, चंद्रशेखर चौधरी, युवकचे वसीम तडवी, जंजाळकर, हर्षल दानी, आसीफ मेकॅनिकल, सरफराज तडवी, इरफान मेंबर, सेवा दलाचे भरत कुवर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेस गणेश गुरव यांनी आभार मानले. ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस पदाधिकारी, अल्पसंख्यांक काँग्रेस, मागासवर्गीय विभाग पदाधिकारी, कार्यकते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !