भुसावळात राष्ट्रवादीतर्फे सोमवारपर्यंत अर्ज वाटपास मुदतवाढ
भुसावळ : आगामी नगरपालिका व जिल्हा परीषद तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत इच्छुकांना फार्म वाटप मोहिमेचा शुभारंभ नुकताच शनी मंदिर वॉर्डातून करण्यात आला होता. जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्याहस्ते या मोहिमेला सुरुवात करण्यात आल्यानंतर त्यांनी काही दिवसांसाठी अर्ज वाटपास ब्रेक लावला मात्र माजी आमदारांनी अर्ज वाटपाची प्रक्रिया हे थांबणार नसल्याचे स्पष्ट करीत जिल्हाध्यक्षांना धक्का दिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत 270 इच्छूकांना फार्म वाटप केले असून सोमवार, 8 ऑगस्टपर्यंत फार्म वाटपास मुदतवाढ देण्यात आल्याचे भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी सांगितले.
इच्छूकांनी साधावा संपर्क
आगामी पालिका निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्यांनी फार्मसाठी भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे, अष्टभूजा डेअरीसमोर, भुसावळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

