पिंपळकोठा गोळीबार प्रकरण : एका आरोपीला अटक
पारोळा : पिंपळकोठा येथे यात्रेदरम्यान पूर्व वैमनस्यातून आरोपी जगदीश पाटील, तुषार प्रदीप कदम व इतर साथीदारांनी भांडण सोडवण्यास गेलेले चेनेश्वर पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. गोळीबारानंतर आरोपी पसार झाले होते. एक आरोपी धुळ्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पारोळा पोलिसांनी सापळा रचून त्यास सोमवार, 2 डिसेंबर रोजी अटक केली. बाळा उर्फ तुषार प्रदीप कदम असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
धुळ्यातून आवळल्या मुसक्या
आरोपी बाळा उर्फ तुषार प्रदीप कदम (19, रा.नवलनगर) हा धुळ्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलिस ठाण्याचे हवालदार रवींद्र रावते, कॉन्स्टेबल सुनील साळुंखे, पंकज राठोड, किशोर भोई, दीपक अहिरे आदींच्या पथकाने केली.



