भुसावळात चोरीच्या उद्देशाने फिरणारा संशयीत जाळ्यात


भुसावळ : चोरीच्या उद्देशाने अंधारात फिरणार्‍या संशयीताला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. धीरज कलीटर पवार (19, रा.घोरठाण, बल्लापूर, ता.जि.अमरावती) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 5 रोजी मध्यरात्री 12.15 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील सुहास हॉटेलच्या पाठीमागील भिंतीच्या आडोशाल संशयीत उभी असल्याची माहिती पेट्रोलिंगवर असलेले पोलिस नाईक रवींद्र बिर्‍हाडे, कॉन्स्टेबल उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींना कळताच त्यांनी संशयीताला ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यातून सहा चावींचा गुच्छा जप्त करण्यात आला. आरोपी पोलिसांना पाहताच त्याच्यावर झडप घालून अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास नाईक रवींद्र बिर्‍हाडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !