‘अंतर्नाद’च्या शाडूची गणेशमूर्ती कार्यशाळेला प्रतिसाद

224 गणेशप्रेमी सहभागी : चिमुकल्या हातांनी साकारले शाडूमातीचे आकर्षक


भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शाडू मातीची गणेशमूर्ती बनवा निशुल्क कार्यशाळा रविवारी घेण्यात आली. या कार्यशाळेत भुसावळ परीसरातील 224 पर्यावरणप्रेमी गणेशभक्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.जास्तीत जास्त गणेशभक्तांनी मातीच्या मूर्तींची स्थापना करून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लागावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते गिरीश महाजन, भाजप शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, यावल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उमेश पाटील उपस्थित होते. कार्यशाळेेचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील तर सूत्रसंचालन जीवन महाजन आणि आभार समन्वयक कुंदन वायकोळे यांनी मानले. 4 ते 15 वर्षे वयोगटाचे 224 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले. मूर्ती कला प्रशिक्षक डिगंबर शिरसाळे, हितेंद्र नेमाडे, अरविंद बडगुजर यांनी तंत्रशुद्ध शैलीत मार्गदर्शन केले. सोबतच ओजस्विनी कला महाविद्यालयाचे विद्यार्थी देवा सपकाळे, कुणाल जाधव, राम मोरे, तौसीफ आसीफ यांनीही मार्गदर्शन केले. सहभागींना शाडू मातीचे भिजवलेले तयार गोळे अंतर्नाद तर्फे देण्यात आले.

विद्यार्थ्यांसह पालकांचा सहभाग
प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील प्रकल्प समन्वयक कुंदन वायकोळे यांनी आयोजन, नियोजनाची जबाबदारी पार पाडली. उपक्रम समिती सदस्य ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, प्रसन्ना बोरोले, जीवन महाजन, संजय भटकर, देव सरकटे, तेजेंद्र महाजन, शैलेंद्र महाजन,विजय देवरे, राहुल भारंबे, विक्रांत चौधरी, अमित चौधरी, कपिल धांडे,नितीन चौधरी, समाधान जाधव, प्रा.श्याम दुसाने, मंगेश भावे, अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांसह पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !