बहादुर शाह जफर उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये क्रीडा पुरस्कार वितरण
भुसावळ : शहरातील बहादुर शाह जफर उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. शाळेचे अध्यक्ष आशिक खान शेर खान व त्यांच्या सौभाग्यवती नूरजहां खान, सदस्य जुबैर शराफुद्दीन, सूर्या अफसर खान, नसरीन, डॉ.हमीद आदी उपस्थित होते. प्राचार्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. वेगवेगळ्या खेळात विजयी झालेल्या पहिल्या, द्वितीय व तृतीय खेळाडूंना बक्षिसे देण्यात आली. कबड्डी, रेसिंग, सायकल रेसिंग, कॅरम, बुद्धीबळ अशा एकूण तीस स्पर्धां व्यतिरिक्त, मेहंदी, पुष्पगुच्छ सजावट आणि खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला. अस्लम बेग सर व जावेद सिद्दीकी यांच्या देखरेखीखाली शाळेचे क्रीडा शिक्षक जफर शेख सार आणि अझर सर यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यलो टीम यांचे शादाब सर व त्यांची टीमने प्रथम क्रमांक पटकावला. विजयी संघांना एक हजार रोख आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. विजेत्या संघाला दोन हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली. सूत्रसंचालन नूरूलहादा कुरेशी यांनी केले.
