युवक युवतींनी मैदानी खेळाकडे वळावे- उमेश नेमाडे


भुसावळातील बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल जाहीर

भुसावळ- युवकांनी सोशल मीडियाच्या जंजाळात अडकून न पडता मैदानी खेळाकडे वळायला हवे, असे मत बुद्धिबळ स्पर्धेच्या पारीतोषिक वितरणप्रसंगी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी व्यक्त केले. जय गणेश फाऊंडेशनच्या स्पोर्ट्स क्लबतर्फे बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजयसिंग चव्हाण व आंतरराष्ट्रीय जलतरण पटू अंश पिल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत 97 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

बक्षीस वितरणप्रसंगी यांची उपस्थिती
पारीतोषिक वितरण प्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह समन्वयक अरुण मांडळकर, गणेश फेगडे, फाऊंडेशनचे सचिव तुषार झांबरे, स्पोर्ट्स क्लबचे रवी जोनवाल, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष दिनकर जावळे आणि पंच मिलींद शिरोळे हे उपस्थित होते.

असा आहे स्पर्धेचा निकाल
बुद्धीबळ स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या गटात श्रीराज चित्तेवान विजेता उपविजेता रेवन भिरुडला ठरला तर आठवी ते दहावीच्या गटात अस्मित चोरडिया
तर उपविजेता गौरव सोनोने ठरला. खुल्या गटात रीयाज तडवी तर उपविजेता दर्पण दुबे
ठरला. विजेत्यांना 555 रुपये रोख बक्षीस, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र तर उपविजेत्यांना 222 रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धा यशस्वीततेसाठी फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष प्रवीण पाटील, सुमित यावलकर, शुभम नेमाडे, हर्षल वानखेडे, सुमित आहुजा, राहुल भावसेकर, अतुल पाटील, रवी पाटील, अनुपसिंग ठाकूर, शरद लोहार यांनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.