Surat’s company defrauded investors of 76 crores: Father and son from Dondaich Arrested सुरतच्या कंपनीचा जादा आमिषाने गुंतवणूकदारांना 76 कोटींचा गंडा : दोंडाईचातील पिता-पूत्रांना अटक


Surat’s company defrauded investors of 76 crores: Father and son from Dondaich Arrested धुळे : गुजरात राज्यातील सुरतच्या शुकुल ग्रुप ऑफ कंपनीने खान्देशातील गुंतवणूकदारांना 56 कोटींचा तर एकूण आतापर्यंत 76 कोटींमध्ये ठेवीदारांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी दोंडाईचा येथील आकाश मंगेश पाटील व मंगेश आकाश पाटील या पिता-पूत्रांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अन्य चौघा आरोपींचा समावेश असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

चार हजार लोकांना लावला चुना
सुरतमधील शुकुल ग्रुप ऑफ कंपनीने गुंतवणुकीच्या रकमेवर प्रत्येक महिन्याकाठी 10 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून खान्देशातील चार हजारांहून अधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करीत 76 कोटींची फसवणूक केली तर खान्देशातून तब्बल 56 कोटी रुपये गोळा करण्यात आले, असे धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील म्हणाले. या गुन्ह्याची व्याप्ती आणि फसवणुकीची रक्कम वाढणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

यांच्याविरोधात गुन्हा
फसवणूक प्रकरणी रवींद्र निंबा नेरकर (42, राणीपुरा, दोंडाईचा) यांच्या फिर्यादीनुसार एक कोटी 40 लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात सुरतमधील प्रदीप शुक्ला ऊर्फ मुन्ना शुकूल, धनंजय बराड, देवेश सुरेंद्र तिवारी, संदीपकुमार मनुभाई पटेल तसेच दोंडाईचा येथील आकाश मंगेश पाटील आणि मंगेश नारायण पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, फसवणुकीचा प्रकरणाची मोठी व्याप्ती असल्याने हा गुन्हा धुळे जिल्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान., स्वतःला या कंपनीचे महाराष्ट्र प्रमुख सांगणारे दोंडाईचा येथील पिता- पुत्रांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.


कॉपी करू नका.