Chief Minister clearly said in Muktainagar; Even if ‘one’ Nath is behind, another ‘Eknath’ is always with you! मुक्ताईनगरात मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले ; ‘एक’नाथ मागे लागले तरी दुसरे ‘एकनाथ’ सदैव सोबत !

मुक्ताईनगरात एमआयडीसी निर्मिती व्यापारी संकुलाची होणार निर्मिती : केळी उत्पादकांना देणार दिलासा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही


Chief Minister clearly said in Muktainagar; Even if ‘one’ Nath is behind, another ‘Eknath’ is always with you ! मुक्ताईनगर : सहा टर्म आमदार असणार्‍यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी घरी बसवले असून हा एक मोठा विक्रमच आहे. सुरूवातीच्या काळात एकनाथ आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागे लागले असलेतरी हा एकनाथ मात्र सदैव सोबत असेल, साथ सोडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुक्ताईनगरातील मंगळवारच्या सभेत आमदार चंद्रकांत पाटलांना आश्वस्त केले. ते म्हणाले की, माझ्यावर कंत्राटी मुख्यमंत्री अशी टीका केली जाते मात्र मी शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी कंत्राट घेतला आहे शिवाय सर्वसामान्य जनता व शेतकर्‍यांसाठी मी कंट्रोल हातात घेतला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

खडसेंचा नामोल्लेख टाळून मंत्री गिरीश महाजन म्हणाले ; मी पणा करणार्‍यांचा अहमपणा संपला 

मुक्ताईनगरात एमआयडीसी निर्मितीची घोषणा
मुक्ताईनगर शहरातील व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल शिवाय शहरात एमआयडीसीची निर्मिती करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आयोजित सभेत दिली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी मुक्ताईनगरातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी केळी उत्पादकांना भेडसावत असणार्‍या सीएमव्ही रोगाबाबत बुधवारी कॅबिनेट बैठकीत ठोस निर्णय घेण्याची ग्वाही देवून केळी उत्पादकांना आश्वस्त केले.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : मुक्ताईनगरात एमआयडीसी होणार ; केळी उत्पादकांचा आज कॅबिनेट बैठकीत मार्गी लावणार !

विकासकामांचे लोकार्पण
प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तालुक्यातील कर्की-पुरनाड सबस्टेशन, नाबार्ड योजनेंतर्गत सुखी नदीवरील पुर्नंबांध तसेच मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील जुन्या गावातील नाटेश्वर मंदिराजवळील सभागृह कामाचे रीमोट दाबून मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केले.

यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, आमदार चंद्रकांत पाटील, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू, संजय गायकवाड, माजी मंत्री बच्चू कडू, खासदार उन्मेश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार लता सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमा तडवी, प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !