रोटरी रेलसिटीतर्फे मातोश्री वृद्धाश्रमास भेट


भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या सदस्यांनी जळगाव येथील मातोश्री वृद्धाश्रमास भेट दिली. वृद्धाश्रमातील जीवन एकसुरी असते. तेथील रहिवाशांना आपलेपणाची भावना मिळावी तसेच त्यांची काही काळ करमणूक होण्यासाठी हा उपक्रम रोटरी क्लबने राबवला. वृद्धाश्रमातील 51 वृद्धांच्या व्यथा जाणून घेऊन त्यावर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला तसेच सर्व सदस्यांनी आपापल्या इच्छेनुसार वर्गणी गोळा करून या वृद्धाश्रमास गोदरेज कंपनीचे दोन कपाट तसेच दैनंदिन जीवनात लागणार्‍या वस्तू भेट दिल्या. निरोप घेताना सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्पप्रमुख डॉ.प्रशांत जाधव यांनी केले. याप्रसंगी मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक संजय काळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.मकरंद चांदवडकर, सचिव सन्मित पोतदार, रोटरी सदस्य विकास पाचपांडे, चेतन पाटील, सोनू मांडे, मनोज सोनार, मिलिंद धर्माधिकारी यांची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !