बोदवड तालुक्यात वादळी पावसाने नुकसान : आमदारांनी दिले पंचनाम्यांचे आदेश


Stormy Rains Damage in Bodwad Taluka : MLAs Ordered Panchnamas बोदवड : तालुक्यातील येवतीसह जामठी तसेच बोदवड तालुक्यातील बर्‍याच ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित प्रशासनाने तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकप्रतिनिधींनी केली पाहणी
नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक सईद बागवान, तालुका कृषी अधिकारी पाडवी, मंडळ अधिकारी पवार, कृषी सहायक मोरे, तलाठी उगले अप्पा, तलाठी रतनाळे, नगरसेवक गोलूभाऊ बरडिया, नगरसेवक हर्षल बडगुजर, नगरसेवक नितीन चव्हाण यांनी नुकसानीची पाहणी करीत आमदारांना माहिती दिली. त्यानंता आमदार पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी शेतकरी सुनील बडगुजर, अकबर मन्यार, युवराज परदेशी, प्रदीप तांगडे, सुभाष बडगुजर, राजु माळी, मनोज राजपूत, धनराज पाटील, खलील मन्यार, अरुण बडगुजर, नाना वंजारी, रहेमतुल्लाभाई मन्यार, जितेंद्र पाटील, मनोज पाटील, सचिन माळी व गोपाल पाटील उपस्थित होते.


कॉपी करू नका.