मंत्री तानाजी सावंत यांची मुक्ताईनगरात प्रतिमा जाळली

मुक्ताईनगर राष्ट्रवादीतर्फे वक्तव्याचा जोडे मारून केला जाहीर निषेध


Effigy of Minister Tanaji Sawant burnt in Muktainagar मुक्ताईनगर : मराठा समाजातर्फे आक्षेपार्ह विधान करणार्‍या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा शहरात निषेध करण्यात आला तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध म्हणून फोटो जाळण्यात आला. बेताल वक्तव्यामुळे केवळ मराठा सामाज्याच्याच नव्हे तर अठरापगड बाराबलुतेदार व सर्वच जाती-धर्माच्या भावना दुखावल्याचे याप्रसंगी पदाधिकार्‍यांनी सांगत सरकारने दोन दिवसात सावंत यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून शिंदे सरकारच्या विरोधात जनआंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला. तहसीलदार श्वेता संचेती व पोलीस निरीक्षक राजेंद्र शेळक यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.पवनराजे पाटील, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस ईश्वर राहणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील, माजी सभापती विकास समाधान पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल महाराज खोले, कार्याध्यक्ष सोपान दुट्ये, शेषराव पाटील, तालुका सरचिटणीस रवी दांडगे, बापू ससाणे, सोनू पाटील, शहराध्यक्ष बबलू सापधरे, दीपक साळुंखे, मुन्ना बोंडे, प्रवीण दामोदरे, हरलाल राठोड, सईद खान, संदीप पाटोळे, संतोष पाटील, निखील पाटील, चंद्रकांत पाटील, प्रदीप पाटील, नितीन पाटील, सारंगराजे, वैभव पाटील, कपिल पाटील, शरीफ शेख, अ‍ॅड.राहुल पाटील, रोशन पाटील, योगेश पाटील, आकाश सुरवाडे, पवन कर्‍हाड, राकेश कर्‍हाड, मनोज इंगळे, जयराज इंगळे, सोपान कोळी, ज्ञानेश्वर भोई, सद्दाम शेख, हातीम भाई, वैभव पाटील, विशाल पाटील, विवेक पाटील, मयूर साठे, आशीष घोगरे, स्वप्नील सोनवणे, दीपक ठाकरे, गौरव साळुंखे, कुंदन महाजन, जय सोनावणे, पंढरीनाथ पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कॉपी करू नका.