Set Back For Eknath Shinde Devendra Fadanvis State Government In Supreme Court Decision About Governor Appointed Mla In Maharashtra ‘सुप्रीम’ दणका ; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीला ‘ब्रेक’


Set Back For Eknath Shinde Devendra Fadanvis State Government In Supreme Court Decision About Governor Appointed Mla In Maharashtra नवी दिल्ली : उद्धव ठाकरे सरकारच्या काळात राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीच्या प्रश्नांवरील अपिल आधीच प्रलंबित असताना आता सुप्रीम कोर्टातून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या रीक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही पावले उचलण्यात येऊ नये, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

या कारणास्तव दिले आदेश
मुंबई हायकोर्टात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात जनहित याचिका करणारे नाशिकमधील रतन सोली लुथ यांनी हायकोर्टाने 13 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपिल केले आहे. हे अपिल प्रलंबित असतानाच राज्यपालांनी 5 सप्टेंबर रोजी आधीच्या उद्धव ठाकरे सरकारने पाठवलेली यादी आताच्या एकनाथ शिंदे सरकारकडे परत पाठवली त्यामुळे आधीच्या यादीचा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असतानाच ती 12 पदे भरण्यासाठी नवी यादी राज्यपालांकडे पाठवली जाण्याची शक्यता आहे, असे रतन यांनी ज्येष्ठ वकील सी. यू. सिंग यांच्यामार्फत सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफव न्यायमर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणले. त्याची दखल घेत पुढील सुनावणीपर्यंत त्या 12 पदांवर राज्यपाल नामनियुक्त आमदारांची नियुक्ती करण्याबाबत कोणतीही पावले उचलू नयेत, असा आदेश खंडपीठाने दिला आहे.


कॉपी करू नका.