भुसावळ विभागात दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम


यावलसह भुसावळातील श्री स्वामी समर्थ केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रम : श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप गुरुचरीत्र पारायणाची सांगता

भुसावळ : श्री दत्त जयंतीनिमित्त भुसावळ शहर व विभागातील दत्त मंदिरामध्ये बुधवारी दिवसभर भाविकांची दर्शनार्थ गर्दी झाली होती. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावलसह भुसावळातील श्री स्वामी समर्थ केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच अखंड नाम जप गुरुचरीत्र पारायणाची सांगता प्रसंगी झाली.

भुसावळात अखंड जप, नाम, यज्ञ सप्ताह
भुसावळ-
शहरातील नंदनवन कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्रात 5 ते 12 दरम्यान अखंड जप, नाम, यज्ञ सप्ताहाचे आयोजन प.पू.गुरूवर्य गुरूमाऊली दिंडोरी दरबार यांच्या आज्ञा आशीर्वादाने करण्यात आले. सप्ताहकाळात अखंड प्रहर सेवा, सात दिवसीय गूरूचरीत्र पारायण, श्री गणेश याग, श्री रूद्र याग, श्री स्वामी याग, चंडी याग, श्री गीताई याग आदी विविध सेवा घेण्यात आल्या. 360 सेवेकर्‍यांनी सात दिवसीय गुरूचरीत्र पारायणाचे वाचन केले. तसेच दुर्गा सप्तशती पाठासाठी शंभर सेवेकर्‍यांनी व श्री स्वामी चरीत्र सारामृतासाठी 186 सेवकर्‍यांनी सेवा बजावली. श्री स्वामी समर्थ मंत्र जपासह नवार्णव मंत्र जप, गायत्री मंत्र जप तसेच महामृत्यूंजप जप करण्यात आला. दरम्यान, गुरुवार, 12 रोजी श्री सत्यदत्त पूजन सकाळी 10.30 वाजता महानैवेद्य व आरती करून जन्मोत्सवाची सांगता होणार आहे.




भुसावळात 31 रोजी रक्तदान शिबिर
भुसावळ-
प.पू.गुरूमाऊलींच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, नंदनवन कॉलनी येथे 31 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात राष्ट्र कल्याणार्थ श्री अब्जचंडी अंतर्गत श्री दुर्गा सप्तशती पाठाचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. वरील सर्व सेवांच्या माध्यमातून राष्ट्र कल्याणासाठी हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावलला पारायणाची सांगता
यावल-
शहरातील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित शाखा- यावल व तालुक्यात, 4 ते 12 डिसेंबरपर्यंत श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप गुरुचरीत्र पारायणाचे आयोजन करण्यात आल्यानंतर बुधवारी सांगता झाली. दत्त जयंतीनिमित्त 800 हुन अधिक सेवेकरी व भाविकांनी सहभाग नोंदविला. 4 डिसेंबर रोजी प्रथम सुनील गावडे व अस्मिता गावडे यांच्याहस्ते ध्वजारोहण व शहरातील प्रमुख देवतांना व सन्मान करण्यात आला. 5 रोजी सप्ताह सुरुवात, देवता अग्नी स्थापना देवता हवन, 6 रोजी नित्य स्वाहाकार श्री गणेश याग व श्री मनोबोध याग रोजी नित्य स्वाहाकार, 8 रोजी नित्य सहकार श्री गीत नित्य सहकार श्री चंडी याग, 10 रोजी श्री रुद्र याग श्री मल्हारी याग तसेच बुधवारी दत्त जयंतीनिमित्त दुपारी 12 वाजता दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. 12 रोजी सत्यदत्त पूजन सकाळी 10.30 वाजता महानैवेद्य आरती पुरणाच्या आरती नंतर सप्ताहाची सांगता होणार आहे. श्री गुरुचरीरत्र पोथी श्री स्वामी
तसेच सात दिवस चालणार्‍या या सप्ताहात अखंड सेवा म्हणून अखंड वीणा वादन, श्री स्वामी समर्थ मंत्र जप, व श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण जवळपास 200 च्या जवळपास भक्तगणांनी सहभाग नोंदविला. श्री स्वामी समर्थ केंद्र शाखा- यावल आयोजक व सेवेकर्‍यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !