रेल्वे अप्रेंटीशीपसाठी नाकारण्यात आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार
खासदार रक्षा खडसे यांचे प्रयत्न : उमेदवारांना मोठा दिलासा
Candidates rejected for Railway Apprenticeship will get another chance मुक्ताईनगर : रेल्वे भरती बोर्ड मार्फत नोटीस क्रमांक अंतर्गत आयटीआय व दहावीच्या गुण पत्राकावरील नावात साम्य नसल्यामुळे रेल्वे अप्रेंटिससाठी नाकारण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांना खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे भरती बोर्डाकडे केलेला पाठपुरावा व प्रयत्नांमुळे पुन्हा संधी मिळणार आहे.
संधी न मिळाल्याने खासदारांकडे तक्रार
रेल्वे भरती बोर्ड मार्फत नोटीसद्वारे पूर्व रेल्वे विभाग अंतर्गत अप्रेंटिससाठी वेगवेगळ्या मंडळ व वर्कशॉपसाठी एकूण 2945 जागांची भरती काढण्यात आली. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर अनेक उमेदवारांना दहावी गुणपत्रक व आयटीआय गुणपत्रक वरील नावात साम्य नसल्यामुळे रेल्वे विभागामार्फत नाकारण्यात (रीजेक्ट) आले होते. यावेळी सदर इच्छुक उमेदवारांनी याबाबत तक्रार केली होती. खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे भरती बोर्ड, दिल्ली व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय यांच्याकडे पाठपुरावा करीत ही लक्षात आणून दिल्यानंतर संधी नाकारण्यात आलेल्या उमेदवारांना अप्रेंटीशीपसाठी संधी देणेबाबत रेल्वे भरती सेल, पूर्व रेल्वे, कोलकता यांनी 10 ऑक्टोबर 2022 पत्राद्वारे खासदार खडसे यांनी कळविले असून त्याबाबत तशा सूचना पूर्व रेल्वे विभागास दिल्या आहे.


प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार
संधी नाकारण्यात आलेल्या उमेदवारांना नाव एकच असल्याबाबतचे श्रेणी एक अधिकार्याच्या सहिनिशी स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र सात दिवसाच्या आत रेल्वे विभागाकडे सादर करायचे आहे तसेच याबाबत सदर उमेदवारांना काही इतर अडचण असल्यास त्यांनी खासदार संपर्क कार्यालय, मुक्ताईनगर दूरध्वनी क्रमांक 02583-235050 वर दिलेल्या मुदतीच्या आत संपर्क साधायचा आहे, अशी माहिती खासदार खडसे यांच्यामार्फत देण्यात आली.