35 runners from Bhusawal participated in Buldana Marathon बुलडाणा मॅरेथॉनमध्ये भुसावळच्या 35 धावपटूंचा सहभाग
उमेश घुले प्रथम तर प्रियंका मंत्री द्वितीय : ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स, बुलडाणा सायकलिंग क्लब व रनबडीजचा उपक्रम
35 runners from Bhusawal participated in Buldana Marathon भुसावळ : ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स, बुलडाणा सायकलिंग क्लब व रनबडीज या संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी (दि. 9) बुलढाणा फॉरेस्ट मॅरेथॉन झाली. 21, 10, 5 व तीन किलोमिटर अशा चार गटात झालेल्या या मॅरेथॉनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे 35 धावपटू सहभागी झाले. यात उमेश घुले 21 किलोमीटर पुरुष गटात प्रथम तर प्रियंका मंत्री यांनी 21 किमी महिला गटात द्वितीय क्रमांक पटकावला. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला.
स्पर्धेत खेळाडूंची चमकदार कामगिरी
बुलडाणा शहरापासून 25 किमी अंतरावर बोथा अभयारण्यात 21 किमीच्या स्पर्धेत सुरुवात झाली. यावेळी स्पर्धेत सुरुवात करण्यासाठी हिरवा झेंडा दाखविण्यासाठी मंचावरील मान्यवरांमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रवीण फालक यांना विशेष निमंत्रीत करण्यात आले होते. अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कमालीचा चढ उताराचा उंच सकल रस्ता, ठिकठिकाणी नागमोडी वळणे, कमालीच्या कोरड्या वातावरणात धावपटूंनी उत्साह कायम ठेवत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. उमेश घुले 21 किलोमीटर पुरुष गटात प्रथम तर प्रियंका मंत्री यांनी 21 किमी महिला गटात द्वितीय क्रमांक पटकावला. भुसावळातील 35 पैकी 3 धावपटूंनी 5 किमी गटात, 11 धावपटूंनी 10 किलोमीटर गटात तर तब्बल 21 धावपटूंनी 21 किलोमीटर गटात सहभाग नोंदविला. यापैकी 6 महिलांचा समावेश होता. यापैकी 10 धावपटू प्रथमच शहराबाहेरील स्पर्धेत सहभागी झाले.

असे आहेत यशस्वी धावपटू
5 किमी गट- संदीप सुरवाडे, प्रदीप माळी, डॉ.सुनील वाडीले, 10 किमी गट- अर्चना चौधरी, माधुरी चौधरी, वर्षा वाडीले, सारंग चौधरी, रमेशसिंग पाटील, सुधाकर सणांसे, इसाक गवळी, अशोक पाटील ,प्रमोद शुक्ला, प्रशांत वंजारी, 21 किमी गट- प्रियंका मंत्री, उमेश घुले, पुनम भंगाळे, प्रिया पाटील, मुकेश चौधरी, संतोष घाडगे, संजय भदाणे, संतोष मोटवानी, तरुण बिरीया, प्रदीप सोलंकी, युवराज सूर्यवंशी, सुरेश सहानी, राजेंद्र ठाकूर, जितेंद्र चौधरी, पंकज कुलकर्णी, अॅड. मोहन देशपांडे, गणसिंग पाटील, प्रवीण वारके, रणजीत खरारे, प्रवीण पाटील.

