ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर भुसावळात शिवसैनिकांचा जल्लोष


भुसावळ : अंधेरीतील पोटनिवडणुकीसाठी शिवसेना चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर राज्यातील शिंदे-ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू असताना राज्य निवडणूक आयोगान शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला मशाल चिन्ह नुकतेच दिले आहे. मशालीचे चिन्ह मिळाल्यानंतर भुसावळातील स्थानिक पदाधिकार्‍यांनी जल्लोष केला.

धगधगती मशाल तर स्वाभिमानाचे प्रतीक
ठाकरे गटाला मशालीचे चिन्ह मिळाल्यानंतर भुसावळ आणि चोपडा विधानसभेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन व तालुकाप्रमुख संतोष सोनवणे यांच्याहस्ते शहरातील व तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत जामनेर रोडवरील चांदनी चौकातील शिवसेना कार्यालयासमोर मशाल पेटवण्यात आली. धगधगती पेटती मशाल म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आक्रमकतेचे, स्वाभिमानाचे, अभिमानाचे आणि प्रामाणिकतेचे प्रतीक असल्याची भावना महाजन यांनी व्यक्त केली. ज्यांनी शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव ठेवण्याचे प्रयत्न केले त्यांना जनता कदापि माफ करणार नाही, अशा भावना तालुकाप्रमुख संतोष सोनवणे यांनी व्यक्त केल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, शहरप्रमुख हेमंत खंबायत, शहरप्रमुख दीपक धांडे, संतोष माळी, रेल कामगार सेना ललित मुथा, उपशहर प्रमुख पवननाले, सोनी ठाकूर, नबी पटेल, अमजद खान, निळे, शांताराम भोई, ज्येष्ठ शिवसैनिक जोहरे, ठाकरे, राकेश खरारे, पवन मेहरा, गोपाळ हिंगणे, राहुल मोरे, राहुल पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !