माजी मंत्री खडसेंचा गौप्यस्फोट ! : बकालेंकडून वाटप होणार्या हप्त्यांची यादी आपल्याजवळ !
अधिवेशनात ‘त्या’ सगळ्या पुढार्यांची नावं वाचून दाखवणार असल्याचा दावा
Ex-minister Khadse’s secret explosion! : We have the list of installments to be distributed by Bakale ! जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याबाबत केलेल्या दाव्याने खळबळ उडवून दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील गुटख्यासह इतर अवैध धंद्यातून होणार्या वसुलीतून पोलिस अधिकारी, राजकारण्यांसह कुणा-कुणाला हप्ते वाटप केले जायचे याची भली मोठी यादी तत्कालीन एलसीबीचे तत्कालीन निलंबित पोलीस निरीक्षक किरण बकालेने आपल्याला लिहून दिल्याचा दावा आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
शहर पोलिसात आंदोलनादरम्यान केला खळबळजनक दावा
जिल्हा दूध उत्पादक संघातील लोणी (बटर) आणि दूध भुकटीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी गुरुवारी दुपारपासून शहर पोलीस ठाणे गाठून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार खडसेंनी दूध संघातील विक्रीतील अपहार प्रकरणी अध्यक्षांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या मांडणार असल्याचा पवित्रा घेतला होता.

अधिवेशनात ‘ती’ यादीच वाचून दाखवणार
दरम्यान, खडसेंनी पोलीस अधिकार्यांशी बोलतांना जळगाव जिल्ह्यात सट्टा, पत्ता, दारू सर्रास सुरु असून गुटख्याच्या धंद्यात तर राजकीय व्यक्ती सहभागी असल्याचा आरोप केला होता. बकाले आपले चांगले मित्र होते परंतु त्याने चुकीचे वक्तव्य केल्याने त्याचा निषेधच आहे. पण बकालेने मला गुटख्यासह इतर अवैध धंद्यातून होणार्या वसुलीतून पोलीस अधिकारी, राजकारण्यांसह आणखी कुणा-कुणाला हप्ते जायचे याची एक मोठी यादी मला दिली आहे. कोणत्या आमदाराला, पुढार्याला किती पैसे देतो?, गुटख्याचे, मटक्याचे धंदे कुणाचे आहेत, हे सगळं बकालेने मला लिहून दिलं आहे. येत्या अधिवेशनात या सर्वांची नावं मी वाचून दाखवणार असल्याचे खडसे यांनी जळगावात सांगितल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.