Shinde government’s former revenue minister Eknathrao Khadse shocked : Yplus security removed overnight शिंदे सरकारचा माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंना धक्का : वायप्लस सुरक्षा रात्रीतून काढली
Shinde government’s former revenue minister Eknathrao Khadse shocked : Yplus security removed overnight मुक्ताईनगर : राज्यातील हेव्हीवेट नेते असलेल्या एकनाथराव खडसे यांची वायप्लस सुरक्षा रात्रीतून शिंदे सरकारने काढल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी रात्री खडसेंनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तब्बल 18 तास आंदोलन केले होते तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने हे खडसेंनी आंदोलन स्थगित केले असताना दुसरीकडे शिंदे सरकारने मात्र गुरुवारी रात्री खडसेंना पुरवण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा काढून घेतली आहे.
गुन्हा दाखल करण्यासाठी रात्रभर ठिय्या
जळगाव दूध संघाच्या गैरव्यवहारावरून जळगावातील राजकीय वातावरण तापले आहे. जळगाव दूध संघात सुमारे दीड कोटींच्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आमदार एकनाथराव खडसे यांनी जळगाव शहर पोलिसांकडे केली मात्र दखल न घेतल्याने गुरुवारी आंदोलन करण्यात आले व गुन्हा दाखल करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा खडसेंनी घेतल्याने राज्यात खळबळ उडाली होती. खडसेंची प्रकृती बिघडल्याने पोलिस स्टेशनच्या आवारातच त्यांची रक्तदाब तपासणी करण्यात आली.

जिल्हा दुध संघ प्रकरणी आता न्यायालयात दाद मागणार
खडसेंनी पोलिस ठाण्यातच आंदोलन केले व गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा घेतला होहता. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीनंतर व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बंदद्वार चर्चेनंतर एकनाथराव खडसेंनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.