बोदवडला किशोर गायकवाड यांना मिळणार सभापती पदाची संधी


बोदवड- बोदवड पंचायत समिती ही गेल्या अडीच वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असून शेलवड गणाचे गणेश पाटील हे सभापतीपदी तर उपसभापतीपदी नाडगाव गणाच्या दीपाली जीवन राणे होत्या. साळशिंगी गणाचे किशोर गायकवाड व मनुर बु.॥ गणाच्याप्रतिभा निलेश टिकारे हे सदस्य म्हणून होते. राज्यातील बदललेल्या (महाविकास आघाडी) या राजकीय समीकरणाचा येथे किंचितही परीणाम होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आरक्षण सोडतीत सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने येथे सभापतीपदा पदासाठी किशोर गायकवाड यांना संधी मिळणार आहे. साळशिंगी हा गण नव्याने अस्तित्वात आला असून प्रथमच हा गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाला असून याच गणातील किशोर गायकवाड यांची सभापतीपदी वर्णी लागली आहे. पंचायत समिती स्थापन झाल्यापासून सभापतीचे आरक्षण हे दोन वेळा सर्वसाधारण महिला व पाच वेळा नामाप्र निघाले आहे. येथे गेल्या दहा वर्षांपासून अनुसूचित जातीच्या उमेदवाराला सभापती पदाची आशा लागून होती. यावेळी ही आशा पूर्ण झाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !