मुक्ताईनगर तालुक्यातील विकासकामांबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदार संघातील रखडलेल्या पुनर्वसनासह शेती शिव रस्ते दर्जोन्नत करावेत, बोदवड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करावे, मुक्ताईनगर येथे एस.टी.महामंडळाच्या जागेवर व्यापारी संकुल उभारावे, मुक्ताईनगर येथे अॅम्युजमेंट पार्कची उभारणी करावी, रखडलेल्या विविध प्रकल्पांवर निधीची तरतूद करावी यासह मतदार संघातील अनेक विविध विकास कामांसंदर्भात गुरुवार, 20 ऑक्टोंबर 2022 रोजी पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या प्रसंगी मागण्यांबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन देण्यात आले.